News Flash

कौतुकास्पद! बाळंतपणानंतर १५ व्या दिवशी बाळाला घेऊन कामावर आली सरकारी अधिकारी

त्या सात महिन्याच्या गरोदर असतानाचा त्यांची करोनाविरुद्धच्या लढाईसाठीसंदर्भात नियुक्ती करण्यात आली

दिवसोंदिवस भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. पहिल्या फळीतील लाखो करोनायोद्धे करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवस रात्र काम करत आहे. अनेक सरकारी अधिकारी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आऊट ऑफ द बॉक्स जाऊन करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सहभागी झालेत. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमधून समोर आलं आहे. येथील उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या सौम्या पांडे यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर १५ व्या दिवशीच पुन्हा कार्यालयात हजेरी लावली आहे. करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी २६ वर्षीय सौम्या यांनी आपल्या लहान बाळाला घेऊनच कार्यालयात उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाचे सध्या सर्व स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे.

सध्या मोदीनगरच्या उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या सौम्या या सात महिन्याच्या गर्भवती असतानाच जुलै महिन्यात त्यांना करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये गाझियाबादल जिल्ह्याच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. जिल्ह्यामध्ये दिवसाला १०० हून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते त्यावेळी नियमांनुसार सौम्या यांना मॅटर्निटी लीव्ह म्हणजेच गरोदर महिलांना देण्यात येणारी विशेष सुट्टी घेण्याची मूभा होती. मात्र त्यांनी सुट्टी घेण्याऐवजी आपल्या क्षेत्रामध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भातील महत्वाचे दौरे सुरुच ठेवले. अनेक ठिकाणी सौम्या यांनी स्वत: जाऊन आरोग्य व्यवस्थांची पहाणी केली. १७ सप्टेंबर रोजी सौम्या यांनी मेरठमधील एका रुग्णालयामध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या १४ दिवसांनंतर त्या आपल्या लहान मुलीला घेऊन कार्यालयामध्ये कामाला रुजू झाल्या.

“डॉक्टर, नर्स आणि अनेक लोकं करोनाच्या कालावधीमध्ये अथक कष्ट करत आहेत. अशा वेळेस मी स्वत:च्या कर्तव्यापासून दूर राहणं चुकीचं आहे. मी केवळ २२ दिवसांची सुट्टी घेतली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर दोन आठवड्यांनी मी कामावर रुजू झाले आहे,” असं सौम्या यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं आहे.

अनेकांनी सौम्या यांचे कौतुक केलं आहे.

१)

२)

३)

४)

५)

सौम्या पांडे यांनी अलहाबादमधील एनआयटीमधून इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलं आहे. २०१६ साली युपीएससी परीक्षेमध्ये सौम्या या संपूर्ण देशामधून चौथ्या आल्या होत्या. त्या एलबीएसएनएए लोक सेवा प्रशिक्षक अकादमीच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी गाझियाबादमध्ये संयुक्त दांडाधिकारी पदाचा पदभार स्वीकारत आपल्या प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. यापूर्वी सौम्या यांनी प्रवासी मजुरांसंदर्भातील कामही केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 9:38 am

Web Title: 14 days after giving birth ghaziabad officer for covid returns to office with newborn in tow scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोठा दिलासा! करोना रुग्णसंख्येत २४ तासांत प्रचंड घट, मृतांची संख्या झाली कमी
2 बिहार विधानसभा निवडणूक; नऊ भाजपा नेत्यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी
3 गायीच्या शेणापासून बनवलेली चिप कमी करणार मोबाईल रेडिएशन; कामधेनू आयोगाचा दावा
Just Now!
X