07 June 2020

News Flash

छत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांना अटक

छत्तीसगडमधील घुसखोरीबाधित क्षेत्रात दोन ठिकाणी स्वतंत्र मोहिमा हाती घेऊन पोलिसांनी चार महिलांसह १४ नक्षलवाद्यांना अटक केली.

| March 16, 2014 05:22 am

छत्तीसगडमधील घुसखोरीबाधित क्षेत्रात दोन ठिकाणी स्वतंत्र मोहिमा हाती घेऊन पोलिसांनी चार महिलांसह १४ नक्षलवाद्यांना अटक केली. सुरगुजा विभागातील बलरामपूर जिल्ह्य़ात सुरक्षारक्षक आणि नक्षलवादी यांच्यात तुफान चकमक झडली. त्यानंतर ११ जणांना पोलिसांनी अटक केली.
केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त पथकाने लाहसनपथ जंगलात शोधमोहीम हाती घेतली, त्यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर ते दाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी जंगलात शोधमोहीम हाती घेऊन ११ संशयितांना अटक केली. नक्षलवाद्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून रायफली, देशी बनावटीचे पिस्तूल, दोन डिटोनेटर्स, सौरऊर्जा साहित्य, स्फोटके जप्त केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2014 5:22 am

Web Title: 14 naxals arrested in chhattisgarh
Next Stories
1 युक्रेनप्रकरणी पुतिन यांच्याशी मून यांची चर्चा
2 ओसामाला शोधण्यात मदत करणाऱ्या डॉक्टरच्या शिक्षेत कपात
3 युक्रेनमध्ये हिंसाचारात आंदोलक ठार
Just Now!
X