वयाच्या सातव्या वर्षी धर्मप्रसारक बनलेला शिवानंद तिवारी हा मुलगा आयआयटी प्रवेश परीक्षा वयाच्या १४ व्या वर्षी उत्तीर्ण झाला असून तो रोहटस जिल्ह्य़ातील धर्मपुरा खेडय़ात राहतो.आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणारा तो देशातील सर्वात कमी वयाचा मुलगा आहे.
  न्यायालयाकडून परवानगी घेऊन त्याने आयआयटी प्रवेश परीक्षा दिली होती. १५ वर्षांखालील मुलामुलींना ही परीक्षा देता येत नाही. वयाच्या चौथ्या वर्षांपर्यंत त्याला आयआयटीची कल्पना नव्हती, पण त्याचे शेतकरी असलेले वडील कमलाकांत तिवारी यांनी व इतर लोकांनी त्याच्यातील हुशारी ओळखली होती. पाटणा येथील एका संस्थेच्या संचालकांनी  त्यांचे मन वळवले. नरैना आयआयटी व पीएमटी अ‍ॅकॅडमीचे संचालक यु.पी.सिंग यांनी त्याला दिल्लीस नेले. पाटण्याचे दीपक सिंग यांनी विशेष पद्धतीने शिकवले, त्यामुळे शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केले व आयआयटीची तयारी केली.