News Flash

आंध्र प्रदेशातील अपघातात लग्नाच्या वऱ्हाडातील १५ ठार

पोलिसांनी सांगितले, की मिनी ट्रक लग्नाचे वऱ्हाड घेऊन कंडुकुर येथून येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसशी धडक झाली.

आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्बय़ात कंडुकुर शहरात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकची बसशी टक्कर होऊन १५ ठार झाले आहेत, तर इतर २१ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी सांगितले, की मिनी ट्रक लग्नाचे वऱ्हाड घेऊन कंडुकुर येथून येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसशी धडक झाली. पंधरा जण यात ठार झाले. दुर्घटनेत बसने पेट घेतला असे पोलीस निरीक्षक एम. लक्ष्मणन यांनी सांगितले. मिनी ट्रकमध्ये चाळीस जण होते, तर बसमध्ये प्रवासीच नव्हते. अग्निशामक दलाने बसची आग आटोक्यात आणली. अधिकाऱ्यांनी सांगितले, की जखमींना कंडुकुर, ओंगोल व नेल्लोर जिल्हय़ात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे वाहतूकमंत्री सिद्ध राघव राव यांनी घटनास्थळी भेट दिली व मदतकार्याची पाहणी केली. जिल्हाधिकारी सुजाता सरमा यांनीही तेथे भेट दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 2:24 am

Web Title: 15 peoples dead in andhra pradesh accident
Next Stories
1 आफ्रिकी देशांच्या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याचा भारताला अभिमान – नरेंद्र मोदी
2 दूरस्थ दीर्घिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात तारकांची निर्मिती
3 दिल्लीत अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
Just Now!
X