नालंदा जिल्ह्य़ातील तराई गावातील प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजनातून शिक्षकासह १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. भोजनानंतर पोटात दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गटविकास अधिकारी चित्तरंजन प्रसाद यांनी सांगितले.
हा विषबाधेचा प्रकार असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अन्नाचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी नेण्यात आल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
योजनेतील त्रुटी दूर करा
बिहारमध्ये माध्यान्ह भोजनातून विषबाधा होऊन काही दिवसांपूर्वी २३ विद्यार्थी दगावले होते. त्याचा संदर्भ देत राज्यसभेत भाजपचे सी. पी. ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. माध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी करताना त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी ठाकूर यांनी केली.