News Flash

केंद्र सरकार १५ हजार टन कांद्याची खरेदी करणार

अतिपिकामुळे कांद्याच्या दरांत प्रचंड घसरण झाली आहे.

| May 28, 2016 01:19 am

कांद्याच्या घसरत्या दरांना वेसण घालण्यासाठी तसेच कांदा उत्पादकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकार आता स्वत: १५ हजार टन कांद्याची खरेदी करणार आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली.
अतिपिकामुळे कांद्याच्या दरांत प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे कांद्याची खरेदी मंदावली असून भाव कोसळल्याने देशभरातील कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यांना दिलासा मिळावा यासाठी आता केंद्रानेच कांदा खरेदी करून बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात पासवान म्हणाले की, नाशिक येथे सरकारने कांदा खरेदी सुरू केली आहे व केंद्र सरकारने राजस्थानसह सर्व कांदा उत्पादक राज्यांत पथके पाठवली आहेत. राज्य सरकारेही कांदा खरेदी करून किंमत स्थिरीकरण निधीच्या वापरातून कांद्याचे कोसळते भाव स्थिर ठेवू शकतात. भारतीय अन्न महामंडळाकडे चांगली गोदामे नाहीत जेणेकरून कांदा साठवता येईल, पण काही गोदामे खासगी क्षेत्रातून भाडेतत्त्वावर घेतली जातील. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना भाजप सदस्य मनोज राजोरिया यांनी कांदा उत्पादकांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली, कारण कांद्याचे भाव मातीमोल झाले आहेत. केंद्र सरकारने कांद्याच्या प्रश्नात हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली.

अतिपीक
* यंदा कांद्याचे उत्पादन २०३ लाख टन
* गेल्या वर्षीचे उत्पादन १९० लाख टन
* सरकारी निर्णयानंतर नाफेडकडून १५०० टन कांद्याची खरेदी
* एसएफसीकडून ८०० टन कांदा खरेदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:19 am

Web Title: 15 thousand tons onions purchased by central government
टॅग : Onion
Next Stories
1 ट्रम्प यांचा उमेदवारीचा मार्ग सुकर
2 फेसबुकवर नेहरूंची स्तुती केल्याने मध्य प्रदेशातील अधिकाऱ्याची बदली
3 काश्मीरमध्ये दोन चकमकी
Just Now!
X