विविध क्षेत्रांत प्रथम पाऊल टाकत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील ११३ महिलांचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे ‘फर्स्ट लेडी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील १५ महिलांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात २० जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

समाजातील दमनकारी प्रवृत्तींचा विरोध झुगारून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या महिलांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या अभिनेत्री दुर्गाबाई कामत आणि देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ. अबन मिस्त्री यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. दुर्गाबाई कामत यांनी दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासूर’  (१९१३) या चित्रपटात पार्वतीचे काम केले होते. त्यांची कन्या कमलाबाई कामत (विवाहोत्तर- कमलाबाई गोखले) यांनी या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती.

१९८८ साली सर्वप्रथम रेल्वे चालवण्याचा विक्रम करणाऱ्या सुरेखा यादव, पाच वेळा बुद्धिबळात भारतीय महिला चॅम्पियनशिप मिळवणाऱ्या भाग्यश्री ठिपसे, देशातील पहिल्या महिला अग्निशामक अधिकारी ठरलेल्या नागपूरच्या हर्षिणी कण्हेकर, देशातील पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक बनलेल्या परभणी जिल्ह्यातील शिला डावरे, वर्सोवा येथील आमदार आणि देशातील पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरू करणाऱ्या डॉ. भारती लव्हेकर, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ बनलेल्या पुण्यातील अरुणाराजे पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासह सर्वप्रथम भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या मुंबईतील डायना एदलजी, देशातील पहिली वाहन चालन प्रशिक्षण संस्था स्थापणाऱ्या मुंबईतील स्नेहा कामत, देशातील पहिल्या नोंदणीकृत महिला खासगी गुप्तहेर बनलेल्या पालघर येथील रजनी पंडित, असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा स्वाती पिरामल, देशातील पहिल्या टेस्टटय़ूब बेबीची प्रसूती करणाऱ्या मुंबईच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा, अंधांसाठी देशातील पहिले जीवनशैलीविषयक मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणाऱ्या मुंबई येथील उपासना मकाती आणि डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योद्धय़ांचा परिचय करून देणाऱ्या मुंबईतील तारा आनंद यांचाही या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

मदर तेरेसा, कल्पना चावला, बछेंद्री पाल, ऐश्वर्या राय बच्चन, पी. व्ही. सिंधु, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकार, मिताली राज आदी कर्तृत्ववान महिलांचाही पुरस्काराच्या यादीत समावेश आहे.