मध्य प्रदेशातील नीमच गावातील १६ वर्षीय फुरकानचा ‘पब्जी या धोकादाय गेमने बळी घेतला आहे. मृत फुरकान याचे वडील हारून राशिद कुरेशी यांच्या मते त्यांचा मुलगा सहा तासांपासून पब्जी खेळत होता. मृत्यू अगोदर तो ब्लास्ट कर, ब्लास्ट कर असे ओरडला होता. यानंतर त्याल रूग्णालयातही नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूवर अतिदाब आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. फुरकान नसीराबादेतील केंद्रीय विद्यालयाचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता.

फुरकानचा मृत्यू त्याची छोटी बहिण फिजा हिच्या समोर झाला. पब्जी खेळल्यानेच आपल्या भावाचा मृत्यू झाला असल्याचे म्हणत फिजाने सांगितले की, तो मृत्यू अगोदर  अयान तु मला मारलस, मी हारलो. आता तुझ्या बरोबर नाही खेळणार  असे जोर जोरात ओरडत होता. तर याप्रकरणी नीमचचे ह्रदयरोग तज्ञ डॅा. अशोक जैन यांनी सांगितले की, असे गेम खेळताना मुल त्यामध्ये पुर्णपणे गुंतुन जातात, स्वतःला त्याच्याशी जोडून घेतात. यानंतर अतिशय भावनावश होऊन ते कार्डिक अरेस्टचे बळी ठरतात. फुरकानला त्यांच्याकडेच आणल्या गेले होते. मुलांनी या धोकादायक खेळापासून दूर रहावे असे आवाहन डॅाक्टरांनी केले आहे.

मृत फुरकानचा भाऊ मो. हाशिम याने सांगितले की, पब्जी गेम एका नशेप्रमाणे आहे. ज्याच्या नशेत मुल १८ तासांपर्यंत सलग गेम खेळतात. हा गेम खेळताना कशाचेच भान राहात नाही. हा गेम खेळणा-या प्रत्येकाचा कोणत्याही परिस्थितीत आपणच जिंकलो पाहिजे असा हट्ट असतो. मी देखील पब्जी खेळत होतो. मात्र माझ्या भावाच्या मृत्यूनंतर आता मी हा गेम मोबाइलमधुन नष्ट केला आहे.