मिरानपूर शहरात १६ वर्षांच्या एका मुलीवर पाच युवकांनी सामूहिक बलात्कार केला.
याप्रकरणी मुलीच्या बहिणीने प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला असून, पाच जणांनी या मुलीस शनिवारी घरातून पळवून नेले व जवळच्याच जागेत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
पाच आरोपींची नावे शकील, जावेद, वकील, मिंटू व शदाब अशी आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी या मुलीला अशी धमकी दिली, की जर या घटनेविषयी कुणाला सांगितले तर त्याचे परिणाम वाईट होतील.
या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी फरारी आहेत त्यांना पकडण्याचे काम चालू आहे.