News Flash

लूटमार करणारे १६० सागरी चाचे भारतातील तुरुंगांत

एडनच्या खाडीत व्यापारी जहाजांना लुटण्याचा प्रयत्न करणारे तब्बल १६० सागरी चाचे भारतीय तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

| December 4, 2013 12:49 pm

लूटमार करणारे १६० सागरी  चाचे भारतातील तुरुंगांत

एडनच्या खाडीत व्यापारी जहाजांना लुटण्याचा प्रयत्न करणारे तब्बल १६० सागरी चाचे भारतीय तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. विशेष म्हणजे या सागरी चाच्यांना त्यांचे सरकार परत घेण्यास तयार नसल्याची माहिती भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
समुद्रात लूटमार करणाऱ्या या सागरी चाच्यांना भारतीय नौदलाने अटक केली आहे. हे डाकू ज्या देशाचे नागरिक आहेत, त्या सिचेलिस, केनिया आणि इतर राष्ट्रांनी त्यांच्या तुरुंगात जागा नसल्याचे कारण पुढे करीत या दोषी नागरिकांना परत घेण्यास नकार दिला आहे. आजमितीस सुमारे १६० सागरी चाचे भारतीय तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची माहिती तामिळनाडू आणि पाँडिचेरी विभागाचे मुख्य नौदल अधिकारी कमांडर अमर के महादेवन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भारतीय सागरी हद्दीत व्यापारी जहाजे तसेच प्रवासी जहाजांना सुरक्षा पुरवण्याचे काम भारतीय नौदल करते. २००८ पासून ३०० भारतीय जहाजांसह जगभरातील २ हजार ६०० च्या वर जहाजांना भारतीय नौदलाने संरक्षण पुरवून इच्छित स्थळी पोहोचवले आहे. त्याचप्रमाणे एडनच्या खाडीतून वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांना सशस्र रक्षक तैनात करण्याबाबतही विचार झाल्याचे महादेवन यांनी सांगितले.
दरम्यान, डिसेंबरअखेर जपानच्या नौदलाची दोन जहाजे संयुक्त लष्करी सरावासाठी चेन्नई येथे येणार असल्याचेही महादेवन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2013 12:49 pm

Web Title: 160 marine robber prison in india
Next Stories
1 ..अखेर फरार नारायण साई पोलिसांच्या जाळ्यात
2 अ‍ॅसिड विक्रीची नियमावली ३१ मार्चपर्यंत तयार करा
3 मतमोजणीपूर्वी मंत्रिमंडळाची बैठकघेण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखावे
Just Now!
X