महाराष्ट्राची रुग्णसंख्या ही आता ३ हजार ८१ इतकी झाली आहे. १६५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही ३ हजारांच्यावर गेली आहे. १६५ रुग्णांपैकी १०७ रुग्ण हे मुंबईत आहेत.  महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. बुधवारी महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ९ मृत्यू झाले होते. शिवाय बुधवारी एकाच दिवशी २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले होते. गुरुवारी त्यात आणखी १६५ जणांची भर पडली आहे.

देशातील १७० ‘हॉटस्पॉट’मध्ये मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ११ जिल्हे
देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची महाराष्ट्रात आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. तर त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारनं राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत करण्यात आलेला आहे.