23 September 2020

News Flash

पाक लष्करी संकुलावर हल्ला, १७ जखमी

पाकिस्तानच्या वायव्येकडील रिसलपूर येथे दोघा दुचाकीस्वारांनी लष्करी संकुलावर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात ५ सैनिकांसह १७ जण जखमी झाले. पाकिस्तानात लष्कर भरती सुरू आहे.

| December 19, 2012 05:56 am

पाकिस्तानच्या वायव्येकडील रिसलपूर येथे दोघा दुचाकीस्वारांनी लष्करी संकुलावर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात ५ सैनिकांसह १७ जण जखमी झाले. पाकिस्तानात लष्कर भरती सुरू आहे. त्यासाठी रिसलपूर येथील लष्करी संकुलासमोर तरुणांनी गर्दी केली होती. त्याच वेळी दोन अज्ञात तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी संकुलाच्या प्रवेशद्वारावर दोन ग्रेनेडस् फेकली.  
हल्ल्यानंतर संपूर्ण भाग लष्कराने बंद केला असून तातडीने हल्लेखोरांना शोधायचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 5:56 am

Web Title: 17 injured in attack on pakistan army complex
टॅग Army,Attack
Next Stories
1 जलदगती न्यायालयात रोज सुनावणीं
2 भूसंपादन विधेयक स्थगित
3 काळ्या पैशामुळे देशाची १२३ अब्ज डॉलरची हानी
Just Now!
X