26 September 2020

News Flash

16 वर्षाची पत्नी झाली आई , संशयापोटी 17 वर्षाच्या पतीने तान्हुल्याला संपवलं

जवळपास वर्षभरापूर्वी दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्न केलं, त्यानंतर भाड्याच्या घरात राहायला लागले.

राजधानी दिल्लीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका 17 वर्षाच्या पित्याने स्वतःच्याच दोन महिन्याच्या चिमुकल्याचा खून केला. त्याच्या 16 वर्षाच्या पत्नीचं दुसरं कोणासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय त्याला होता, त्यामुळे त्याने स्वतःच्याच तान्हुल्याला संपवलं. दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात ही घटना घडली आहे.

शनिवारी २१ एप्रिल रोजी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले. चिमुकल्याच्या आईला घेऊन पोलीस ज्या संजय गांधी रुग्णालयात मुलाला भरती करण्यात आलं होतं तेथे पोहोचले. गळ्यावरील वळ पाहून पोलिसांना संशय आला, त्यांनी चौकशी सुरू केल्यानंतर आपल्या पतीनेच मुलाचा खून केला असा आरोप तिने केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अल्पवयीन पित्याला मंगोलपुरी परिसरातून ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडिल अल्पवयीन मुलासोबतच्या नात्याचा विरोध करत होते. पण मुलगी गर्भवती राहिल्यानंतर त्यांनी नातं स्वीकारलं. जवळपास वर्षभरापूर्वी दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्न केलं, त्यानंतर भाड्याच्या घरात राहायला लागले. मुलगी सेंट्रल दिल्लीतील एका दुकानात काम करते, तर आरोपी पिता हा नशेच्या आहारी गेला होता. त्याला मोबाइलच्या दुकानातून फोन चोरल्यामुळे वडिलांनी घरातून हाकललं होतं.

मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पित्याचा त्याच्या पत्नीवर संशय होता. दुसरं कोणासोबत तिचे संबंध आहेत अशी शंका त्याला होती. यावरुन दोघांमध्ये अनेकदा बाचाबाची झाली होती. ती ज्या दुकानात काम करते तेथीलच एका मुलासोबत संबंध असल्याचा संशय तिचा पती घ्यायचा. यावरुन तो तिला मारहाणही करत असे.

शनिवारी अल्पवयीन पत्नी दुकानात कामाला गेली असताना तिचा नवरा नशेत घरी आला. त्यावेळी त्याची नजर तान्हुल्यावर पडली आणि त्याने चपलांनी त्याला माराहण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला आणि मृतदेहाला गादीवरच ठेवून त्याने पळ काढला. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन पित्याला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 12:42 pm

Web Title: 17 year old father kills his 2 month old son suspecting wife of infidelity
Next Stories
1 हवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली, तिघे जखमी
2 भारताच्या ‘या’ राज्यात घरात शौचालय नसल्याने रोखले पगार
3 बारा वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशी: वटहुकूमास राष्ट्रपतींची मंजुरी
Just Now!
X