05 March 2021

News Flash

भयंकर! घरातून पळालेल्या १७ वर्षीय मुलीवर २२ दिवस सामूहिक बलात्कार

पोल्ट्री फॉर्ममध्ये ठेवलं होतं डांबून

(संग्रहित छायाचित्र)

आईवडिलांशी भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडलेल्या १७ वर्षीय मुलीवर २२ दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घरी नेऊन सोडतो म्हणत आरोपीनं बस स्थानकासमोरून मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर शेतातील घरात डांबूर ठेवत तिच्यावर २२ दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आला.

देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना चर्चेत असतानाच ओडिशातील कटकमध्ये आणखी एक सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे.

जगतसिंगपूर जिल्ह्यातील तिर्टोल येथील एका १७ वर्षीय मुलीचा आईवडिलांशी वाद झाला होता. भांडण झाल्यानंतर मुलगी घरातून निघून गेली होती. ओएमपी चौकातील बस स्थानकासमोर तिला एक व्यक्ती भेटला. तुला घरी सोडतो म्हणत तिला घेऊन तिर्टोलच्या दिशेनं निघाला. मात्र, तिर्टोल जाण्याऐवजी मध्येच तो तिला गतीरौटपटना गावातील एका पोल्ट्री फॉर्मवर घेऊन गेला. तिथे एका खोलीत तिला डांबून ठेवलं.

त्यानंतर दोन व्यक्तींनी तिच्यावर २२ दिवस अत्याचार केला. ग्रामस्थांना संशय आल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली. माहिती कळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी पोल्ट्री फॉर्म धाड टाकली. त्यानंतर अपहरण केलेल्या मुलीची सुटका करण्यात आली. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, दुसऱ्याचा शोध सुरू केला आहे.

फरार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं तयार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचबरोबर पीडित मुलीला जिल्हा बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर तिला अनाथश्रमात पाठवण्यात आलं आहे.

या घटनेवरून विरोधकांनी बीजेडी सरकारला लक्ष्य केलं आहे. काँग्रेस आणि भाजपाकडून सरकारवर टीका करण्यात येत असून, “सामूहिक बलात्काराच्या या घटनेतून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचंच दिसत आहे,” अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते निशिकांत मिश्रा यांनी केली आहे. या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात यावा. त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत देण्यात यावी,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 11:18 am

Web Title: 17 year old girl runaway abducted gangraped for 22 days at farm in cuttack bmh 90
Next Stories
1 केरळमधील सोनं तस्करीत दाऊदचा सहभाग असल्याची शंका, एनआयएची कोर्टात माहिती
2 मृत समजून मोठ्या भावाला ठेवलं फ्रीझरमध्ये, पण दुसऱ्या दिवशी घडलं भलतंच…
3 दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, गरिबीला कंटाळून आईनेच घेतला सहा वर्षाच्या चिमुरडीचा जीव
Just Now!
X