21 January 2018

News Flash

अमेरिकेत मशिदीत निघालेल्या युवतीची हत्या करून तलावात फेकला मृतदेह

१७ वर्षीय नबरा ही आपल्या मित्रांबरोबर मशिदीत जात होती.

नवी दिल्ली | Updated: June 19, 2017 7:15 PM

व्हर्जिनिया येथे १७ वर्षीय नबरा या मुस्लिम युवतीची हत्या करून तिचा मृतदेह तलावात फेकण्यात आला आहे.

अमेरिकेत एका मुस्लिम युवतीची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. व्हर्जिनिया येथे १७ वर्षीय मुस्लिम युवतीची हत्या करून तिचा मृतदेह तलावात फेकण्यात आला आहे. विदेशातील माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार १७ वर्षीय नबरा ही आपल्या मित्रांबरोबर मशिदीत जात होती. तेव्हा कारमधून आलेल्या एका व्यक्तींशी त्यांचा वाद झाला. त्याचवेळी नबराबरोबर असलेल्या तिच्या मित्रांनी आपला घाबरून तेथून पळ काढला. संशयित व्यक्तीने नबराला बेदम मारहाण केली. या मारहाणीत नबराचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह तलावात फेकून दिला. ही घटना रविवारी (दि. १८) घडल्याचे समजते. पोलिसांनी तपास सुरू केला असून तलावातून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. नबराचा मृतदेह रीडटॉप सर्कल येथे मिहाला. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. डार्विन मार्टिनेझ टॉरिस असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटना जिथे घडली त्या परिसरात संशयितरित्या फिरताना पोलिसांनी डार्विनला अटक केली. त्याचबरोबर त्याच्याकडून एक बेसबॉल बॅटही जप्त केली आहे. नबराची हत्या करण्यासाठी त्याने बेसबॉल बॅटचा वापर केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा ‘हेट क्राइम’चा प्रकार असण्याची शक्यताही पडताळण्यात येत आहे. परंतु, पोलिसांनी अधिकृतरित्या याबाबत काही सांगितलेले नाही. पीडित मुलगी ही मशिदीच्या कार्याशी निगडीत होती या वृत्तास परिसरातील ऑल डल्स एरिया मुस्लिम सोसायटीने दुजोरा दिला आहे.

First Published on June 19, 2017 7:15 pm

Web Title: 17 year old muslim girl nabra murdered virginia mosque body found in pond
  1. No Comments.