30 November 2020

News Flash

काबूलमध्ये बॉम्बस्फोट, १८ ठार, ५७ जखमी

काबूलच्या पश्चिम भागातील दश्त-ए-बर्ची या शियाबहुल परिसरातील शैक्षणिक केंद्राबाहेर हा स्फोट झाला

काबूल : काबूलमधील एका शैक्षणिक केंद्राबाहेर शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १८ जण ठार, तर शाळकरी विद्यार्थ्यांसह ५७ जण जखमी झाले.

काबूलच्या पश्चिम भागातील दश्त-ए-बर्ची या शियाबहुल परिसरातील शैक्षणिक केंद्राबाहेर हा स्फोट झाला. हल्लेखोर या केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवले असता त्याने स्फोट घडवून आणला, असे अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक अरियन यांनी सांगितले. अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसून, तालिबानने या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये एका शैक्षणिक केंद्रात झालेल्या अशाचप्रकारच्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी आयसिसशी संलग्न एका संघटनेने स्वीकारली होती. या हल्ल्यात ३४ विद्यार्थी ठार झाले होते. अफगाणिस्तानात आयसिसने त्यांच्या मते धर्मभ्रष्ट असलेल्या अल्पसंख्याक शिया, शीख व हिंदू यांच्यावर मोठय़ा प्रमाणावर हल्ले सुरू केले आहेत. अफगाणिस्तानात गेली अनेक दशके सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी बोलणी सुरू केली असतानाच तालिबान व सुरक्षा दलांमधील हिंसाचारात वाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 3:17 am

Web Title: 18 kills injures 57 in bomb blast kabul zws 70
Next Stories
1 १९६२ पेक्षा आताची स्थिती  वेगळी -पेमा खांडू
2 गुपकार आघाडीची लवकरच काश्मीरबाबत श्वेतपत्रिका
3 कृषी क्षेत्र बळकट करण्यासाठी केंद्राचा पुढाकार -पंतप्रधान मोदी
Just Now!
X