News Flash

राजस्थानातील चकमक प्रकरणात १९ पोलीस निलंबित

राजस्थानातील नागौर जिल्ह्य़ात दंगावस खेडय़ात झालेल्या चकमकीत सहा जण ठार झाले असून त्यात पाच दलितांचा समावेश होता, याप्रकरणी १९ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

| June 1, 2015 03:52 am

राजस्थानातील नागौर जिल्ह्य़ात दंगावस खेडय़ात झालेल्या चकमकीत सहा जण ठार झाले असून त्यात पाच दलितांचा समावेश होता, याप्रकरणी १९ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
मेरटा पोलीस स्टेशनचे दोन सहायक उपनिरीक्षक व हेड कॉन्स्टेबल यांना निष्काळजीपणामुळे निलंबित केले आहे.
नागौरचे पोलीस अधीक्षक राघवेंद्र सुहासा यांनी सांगितले की, नागरामच्या पोलीस अधिकाऱ्यास याआधीच निलंबित केले आहे.
१४ मे रोजी कनाराम जाट व रत्नाराम मेघवाल व त्यांच्या समर्थकांत जमिनीच्या मालकीवरून धारदार शस्त्रे व बंदुकांसह चकमक झाली.
त्यात तीन दलितांसह चार जण मारले गेले होते. दोन दलितांचा नागौर येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता.
राज्य सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 3:52 am

Web Title: 19 cops removed over dangawas clash in rajasthan
Next Stories
1 ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय योग्यच
2 अडीच वर्षांच्या मुलाचा बुद्धय़ांक १४२
3 जपानमध्ये पुन्हा मोठय़ा भूकंपाची शक्यता
Just Now!
X