News Flash

धक्कादायक! ‘पद्मावत’च्या शोदरम्यान चित्रपटगृहातच तरुणीवर बलात्कार

या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली

संग्रहित छायाचित्र

सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणासोबत ‘पद्मावत’ चित्रपट बघायला गेलेल्या तरुणीवर चित्रपटगृहातच बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली असून चित्रपगृह मालकावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तावनुसार हैदराबादमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीची २३ वर्षांच्या के. भिक्षपती याच्याशी काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. हळूहळू दोघांमधील मैत्री वाढत गेली. सोमवारी भिक्षपती हैदराबादमध्ये नातेवाईकांना भेटायला आला होता. हैदराबादमध्ये आल्यावर भिक्षपतीने पीडित तरुणीला भेटायला बोलावले. काही वेळ इंदिरा पार्कमध्ये फिरल्यानंतर भिक्षपतीने पीडित तरुणीला ‘पद्मावत’ चित्रपट बघायला नेले. चित्रपटगृहात फारसे प्रेक्षक नव्हते. यादरम्यान भिक्षपतीने तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेने धाडस दाखवत आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. चित्रपटगृह मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा विचार सुरु आहे. निष्काळजीपणासाठी ही कारवाई केली जाणार आहे. चित्रपटगृहात कर्मचारी असतात, ते कर्मचारी घटना घडत होती त्यावेळी कुठे होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 1:19 pm

Web Title: 19 year old girl allegedly raped in theatre while watching padmaavat in hyderabad man arrested
Next Stories
1 ‘पद्मावत’ पहायला गेलेल्या मुलीवर चित्रपटगृहात बलात्कार
2 साताऱ्यात भूकंपाचे धक्के
3 फिडेल कॅस्ट्रो यांच्या मुलाने नैराश्येमुळे केली आत्महत्या
Just Now!
X