23 September 2020

News Flash

सेक्स टॉयद्वारे महिलेवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणीला अटक

सुप्रीम कोर्टाने समलैंगितेला (सेक्शन ३७७) गुन्ह्याच्या कक्षेबाहेर ठेवल्यामुळे पोलिसांनी १९ वर्षीय मुलीविरोधात गुन्हा दाखल केला नव्हता.

प्रतिनिधिक छायाचित्र

२५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली १९ वर्षीय तरूणीला पोलिसांनी अटक केली आहे. सेस्क टॉयचा वापर करत पीडित महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप १९ वर्षीय महिलेवर आहे. न्यायालयाने आरोपी तरूणीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शाहदरा जिल्ह्यातील पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे हे प्रकरण असून ते गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उघड झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरूणाला अटक करत गुन्हा दाखल केला होता. सुप्रीम कोर्टाने समलैंगितेला (सेक्शन ३७७) गुन्ह्याच्या कक्षेबाहेर ठेवल्यामुळे पोलिसांनी १९ वर्षीय मुलीविरोधात गुन्हा दाखल केला नव्हता.

१९ वर्षीय तरुणीने मारहाण करत अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप २५ वर्षीय पीडित महिलेने केला आहे. सोमवारी आरोपी तरूणीचा जबाब नोंदवल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपी तरूणीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असून तिची रवानगी तिहाड जेलमध्ये केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलम १६४-क नुसार कडकड्डूमा कोर्टात आरोपी तरूणीचा जबाब नोंदवण्यात आला.

काय आहे प्रकरण –
२५ वर्षीय पीडित महिला बिझनेस प्लानमध्ये छोटे गुंतवणूकदार मिळवण्याचे काम करत होती. त्यानिमित्ताने ती दररोज अनेक लोकांना भेटत असे. एक दिवस तिची भेट रोहित आणि राहुल यांच्याशी झाली. या दोघांनी पीडित महिलेस दिल्लीतील दिलशाद कॉलनीमधील एका अपार्टमेंटमध्ये नेहले. तिथेच २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रसंगाचा व्हिडीओ काढत पीडित महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यात आरोपी १९ वर्षीय तरुणी पीडित महिलेवर सेक्स टॉयचा वापर करत संबंध ठेवत असे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 10:18 am

Web Title: 19 year old woman arrested for raping another woman in first such case after section 377 verdict
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटी लागू करा, भाजपाची मागणी
2 भाजपा म्हणते, “तो ‘सिली बॉय’ राहुल को धोपटेंगे ना”
3 प्रियंका गांधींबाबत अश्लिल टिप्पणी करणाऱ्याला अटक
Just Now!
X