दिवसेंदिवस देशभरात जीवघेण्या कोरना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात करोनामुळे एकूण ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात आणखी १ हजार ९७५ रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या २७ हजारांजवळ पोहोचली आहे. रविवारी संध्याकाळी ६ पर्यंत देशातील करोना रुग्णांची संख्या २६ हजार ९१७ झाली होती.

देशभरातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येमध्ये बरे होऊन घरी गेलेल्या ५ हजार ९१४ लोकांचाही समावेश आहे. शिवाय गेल्या २४ तासांतील मिळून एकूण मृतांची संख्या ८२६ वर गेली आहे. याचा अर्थ सध्या देशभरातील रुग्णालयांमध्ये २० हजार ९१७ करोना रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं दिली आहे.

जगभरात सर्वत्र फैलाव झालेल्या जीवघेण्या करोना व्हायरसने जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत अक्षरशा थैमान घातले आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अमेरिकेत तब्बल २ हजार ४९४ जाणांचा करोनाने बळी घेतला आहे.

यामुळे अमेरिकेत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या संख्या आता एकूण ५३ हजार ५११ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत तब्बल ९ लाख ३६ हजार २९३ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.