04 March 2021

News Flash

anti-Sikh riots case : जन्मठेप झालेल्या सज्जनकुमार यांची मंडोली तुरुंगात रवानगी

1984 anti-Sikh riots case : मुदत आज संपणार; सज्जनकुमार शरण येण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र

१९८४ मधील शीखविरोधी दंगलप्रकरणी दोषी ठरलेले महेंदर यादव, किशन खोखर आणि काँग्रेस नेते सज्जनकुमार हे आज (दि.३१) दिल्लीच्या कारकारदुमा कोर्टासमोर शरण आले. कोर्टाने त्यांच्या शरणागतीचा अर्ज स्विकारला. या प्रकरणात  जन्मठेपेची शिक्षा झालेले काँग्रेसचे माजी नेते सज्जनकुमार हे दुपारी अडीजच्या सुमारास कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर कोर्टाने त्यांना दिल्लीच्या मंडोली तरुंगात रवानगीचे आदेश दिले. ३१ डिसेंबरपर्यंत दिल्ली हायकोर्टाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या तिघांनी आज कोर्टासमोर हजेरी लावली.

दिल्लीच्या कारकारदुमा कोर्टात शरण आल्यानंतर कोर्टाने सज्जनकुमारची मंडोली तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव सज्जनकुमार यांना खास वाहनातून तुरुंगापर्यंत नेण्यात यावे असे आदेशही कोर्टाने पोलिसांना दिले.

दंगलीदरम्यान एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने १७ डिसेंबर रोजी सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ही दंगल म्हणजे माणुसकीला काळीमा असल्याचे कोर्टाने म्हटले होते. त्याचबरोबर ३१ डिसेंबरपर्यंत त्यांनी पोलिसांसमोर शरण यावे, असे आदेशही कोर्टाने दिले होते. यावर सज्जनकुमार यांनी ही डेडलाइन वाढवून ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी कोर्टात अर्ज केला होता.

मुदतवाढीचा अर्ज करताना सज्जनकुमार यांनी म्हटले होते की, माझे मोठे कुटुंब आहे, कुटुंबातील काही महत्वाच्या विषय मला मार्गी लावायचे आहेत. यामध्ये काही विषय हे प्रॉपर्टीसंबंधी आहेत. मात्र, त्यांचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. त्यामुळे सज्जनकुमार यांना आज शरण यावेच लागणार आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात २३ डिसेंबर रोजी सज्जनकुमार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तसेच यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही कोर्टाला केली होती. तसेच हायकोर्टाने आपल्याला अन्यायकारक शिक्षा सुनावल्याचा दावा केला होता. मी कट केल्याचा कुठलाही सबळ पुरावा नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 12:48 pm

Web Title: 1984 anti sikh riots case sajjan kumar likely to surrender today
Next Stories
1 तिहेरी तलाक विधेयकामुळे धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मतेला धोका : चंद्राबाबू नायडू
2 क्रिकेटपटू ते राजकारणी; बांगलादेशी कर्णधाराचा निवडणुकीत दणदणीत विजय
3 भाजपाचा नेता आहे सांगताच पोलीस अधिकारी म्हणाला, ‘मग तर अजून मारणार’
Just Now!
X