१९८४च्या शिखविरोधी दंगलींप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने कॉंग्रेस नेते सज्जनकुमार यांची मंगळवारी सर्व आरोपांतून निर्दोष सुटका केली. या प्रकरणातील अन्य पाच आरोपींना न्यायालयाने दोषी म्हणून जाहीर केले.
१९८४ मध्ये दिल्लीतील कॅंटोन्मेट भागात जमावाने पाच शिखांची हत्या केली होती. याचप्रकरणी न्यायालयाने पाच जणांना भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी म्हणून जाहीर केले. याचप्रकरणात बलवान खोक्कर, किशन खोक्कर, महेंद्र यादव, गिरधारी लाल आणि कॅप्टन भागमल यांच्याविरुद्ध जमावाला एका विशिष्ठ समुदायाविरुद्ध भडकाविणे, कट रचणे इत्यादी आरोप ठेवण्यात आले होते.
त्यावेळी भडकलेल्या दंगलींची चौकशी करणाऱया न्या. जी. टी. नानावटी आयोगाच्या अहवालानंतर सीबीआयने सज्जनकुमार यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध २००५ आणि २०१० असे दोन वेळा आरोपपत्र दाखल केले होते.