1984 Anti Sikh Riots: १९८४ मधील शीखदंगली प्रकरणी दिल्लीतील हायकोर्टाने काँग्रेस नेता सज्जन कुमारला दोषी ठरवले आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या काँग्रेस नेता सज्जन कुमारला कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त केले होते. या सुटकेला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या खटल्यात सोमवारी हायकोर्टाने निर्णय दिला. हायकोर्टाने सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत सहा व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सज्जन कुमार, ब्रह्मानंद गुप्ता, खुशाल सिंग, वेद प्रकाश आणि आणखी एकाविरोधात हत्येचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. जी.टी.नानावटी आयोगाने २००५ मध्ये सूचना केल्यानंतर पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर जानेवारी २०१० मध्ये सीबीआयने या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.  कनिष्ठ न्यायालयाने सज्जन कुमारला दोषमुक्त करताना अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावाही हायकोर्टातील सुनावणीत करण्यात आला होता.

utkarsha rupwate-resigns from congress
शिर्डीत महाविकास आघाडीला धक्का, काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवतेंनी दिला राजीनामा, वंचितच्या तिकिटावर लढणार?
why Kanhaiya Kumar contesting from North East Delhi Lok Sabha seat
कन्हैया कुमारला काँग्रेसने बिहारऐवजी दिल्लीतूनच उमेदवारी का दिली?
Lok Sabha Elections 2024 : प्रस्थापितांना भाजपचा धक्का; वरुण गांधी, अनंतकुमार हेगडेंना डच्चू
pune loksabha marathi news, aaba bagul latest marathi news, aaba bagul marathi news
पुण्यात रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीला विरोध; काँग्रेस नेते आबा बागुल म्हणाले, “काँग्रेसच्या निष्ठावंतांना सातत्यानं डावललं…”

हायकोर्टाने सोमवारी या खटल्यात निकाल दिला. हायकोर्टाने सज्जन कुमारला दोषी ठरवले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सज्जन कुमारला ३१ डिसेंबरपर्यंत पोलिसांपुढे शरण येण्याची मुदत देण्यात आली आहे. सज्जन कुमारने दिल्ली महानगरपालिकेपासून राजकारणाला सुरुवात केली होती. तो तीन वेळा काँग्रेसचा खासदार होता.

सज्जन कुमारसह कॅप्टन भागमल, गिरीधारी लाल आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक बलवान खोखार या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर किशन खोखार आणि महेंद्र यादव या दोघांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.