News Flash

अयोध्या-बाबरी वादामुळे कशी पेटली मुंबई?

बाबरी मशिदीच्या घटनेनंतर त्याच दिवसापासून मुंबई व देशाच्या काही भागात दंगली सुरू झाल्या होत्या...

(1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट, संग्रहित छायाचित्र - Indian Express)

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या. पण सर्वाधिक आक्रमक प्रतिक्रिया उमटली ती मुंबईतून. बाबरी विध्वंसानंतर मुंबईत उसळलेल्या दंगलीत जवळपास ९०० जणांचा जीव गेला. हजारो जणांनी घाबरुन पळ काढला. २७ वर्षांनंतरही अनेकांच्या मनात या दंगलींची दहशत कायम आहे.

बाबरी मशिदीच्या घटनेनंतर त्याच दिवसापासून मुंबई व देशाच्या काही भागात दंगली सुरू झाल्या होत्या. मुंबईतील मुस्लिम बहुल परिसरात नागरीक रस्त्यावर उतरुन बेस्ट बसेस आणि पोलिसांवर आपला राग काढत होते. त्यातच शिवसेना आणि भाजपाने काढलेल्या विजयी रॅली आणि त्यातील चिथावणीखोर घोषणांनी परिस्थिती अजून चिघळली. नंतर मशिद बंदर भागात दोघा माथाडी कामगारांना भोसकण्यात आल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी तीव्र पडसाद उमटले. त्यात हिंदू व मुस्लिम समाजातील निरपराधांचे बळी गेले. अशातच सूड घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याने टायगर मेमन, मोहम्मद डोसा आदींच्या साथीने बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचला.

आणखी वाचा- आडवाणी, रथयात्रा, गुजरात दंगल आणि नरेंद्र मोदी…. असा होता प्रवास

फेब्रुवारी, १९९३ मध्ये रायगड जिल्ह्यात दिघी व शेखाडी बंदरात एके ५६ बंदुका व आरडीएक्सचे साठे उतरविण्यात आले. त्यानंतर १२ मार्च, १९९३ रोजी मुंबईतील शेअर बाजार, एअर इंडिया इमारत, सेंचुरी बाजार, प्लाझा सिनेमा, नायगाव, विमानतळ प्रवेशद्वार आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. मुंबईत १३ ठिकाणी एकापाठोपाठ एक असे १३ बॉम्बस्फोट झाले आणि त्यात जवळपास २५७ जणांचे प्राण गेले. आंतरराष्ट्रीय दहशतवादाची ओळख भारताला त्या बॉम्बस्फोटांनी झाली. या बॉम्बस्फोटांच्या आधीच्या वर्षातच अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. मुंबईतील बॉम्बस्फोट ही त्याचीच परिणती होती असे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 7:43 am

Web Title: 1992 babri masjid demolition to mumbai bomb blasts 1993 sas 89 2
टॅग : Ram Mandir,Ram Temple
Next Stories
1 लेबनान स्फोट : ७० जण ठार तर ४००० जखमी
2 शापित नायक!
3 बाबरी मशीद पाडल्यानंतर हे होतं बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य…
Just Now!
X