उत्तर प्रदेशमध्ये दहा वर्षांच्या मुलीची वेणी कापण्यात आल्याची अफवा पसरवल्याच्या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. भिकन व नंदकिशोर अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांना जेरॉय हयातनगर खेडय़ातून काल रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. बाहजोई पोलीस स्टेशनचे ब्रजमोहन गिरी यांनी सांगितले की, या प्रकरणी या दोघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

संभळचे पोलीस अधीक्षक रवी शंकर छाबी यांनी सांगितले की, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
pune crime news, son beats mother pune marathi news,
मुलाकडून आईला बेदम मारहाण… घर नावावर करून देत नसल्याने डोक्यात मारली खूर्ची
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

वेणी कापण्याच्या घटना दिल्ली, पंजाब, हरयाणा व दिल्ली या राज्यांतून सामोऱ्या आल्या असून त्याबाबत गूढ आहे. संगरूर जिल्ह्य़ातील चंदू खेडय़ातील मीना राणी या २३ वर्षांच्या विवाहितेने सांगितले की, काल सकाळी उठले असता वेणी कापलेली होती. कापलेले केस जमिनीवर पडलेले होते. खोलीत ती एकटीच झोपली होती त्यामुळे कुणी केस कापले हे समजू शकले नाही.

कुटुंबातील इतर जण बाहेर झोपले होते. भटिंडा, मुक्तसर व मुलोट येथे दोन-तीन दिवसात वेण्या कापण्याच्या घटना घडल्या आहेत. मुक्तसर जिल्ह्य़ातील भारू या खेडय़ातील एका मुलीने सांगितले की, सकाळी उठले असता माझी वेणी कापलेली होती. भावाने ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. या घटनेनंतर काही ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे.

भटिंडा येथील चौसर बस्ती येथील सपना या महिलेने सांगितले की, ती सकाळी प्रसाधनगृहात गेली असता बेशुद्ध पडली व नंतर शुद्धीवर आली तेव्हा वेणी कापलेली होती. शेजारच्या राज्यातून अशाच घटना सामोऱ्या येत आहेत.