News Flash

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन सीआरपीएफ जवान, एसपीओ शहीद

परिसरात नाकाबंदी दहशतवाद्यांचा शोध सुरु

गलवान खोऱ्यासह काही भागातून चीन मागे हटला आहे पण पँगाँग टीएसओ क्षेत्रातून चीन मागे हटायला तयार नाहीय त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद आहे.

केंद्रीय राखीव पोलीस बलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) हे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी सकाळी ही घटना घडली.

यावेळी झालेल्या गोळीबारात काही सुरक्षा रक्षकांना गंभीर इजा झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामुल्लातील क्रिरी भागात ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवर दहशतवाद्यांनी केलेला हा गेल्या तीन दिवसातील दुसरा हल्ला आहे. १४ ऑगस्टला श्रीनगरमधील नवगाम भागात दोन पोलीस दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. तर एकजण जखमी झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 10:58 am

Web Title: 2 crpf troopers spo killed in terrorist attack in j ks baramulla aau 85
Next Stories
1 मशिदीत गाण्याचा व्हिडीओ; अभिनेत्री सबा कमरसह अन्य कलाकारांवर गुन्हा दाखल
2 भाजपाबाबत नरमाईच्या ‘त्या’ वृत्तावर फेसबुकनं केला खुलासा
3 भारतात २४ तासात आढळले ५७,९८२ नवे करोना रुग्ण; एकूण रुग्णसंख्या २६ लाखांच्या पार
Just Now!
X