26 February 2021

News Flash

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली; २ ठार, २१ जण जखमी

१३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना त्वरीत नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथील पावकी देवीजवळ एक बस दरीत कोसळली. यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर २१ जण जखमी झाले. (छायाचित्र: एएनआय)

उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथील पावकी देवीजवळ एक बस दरीत कोसळली. यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर २१ जण जखमी झाले. जखमींना त्वरीत नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील १३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात मंगळवारी सकाळच्या सुमारास झाला.

बस दरीत कोसळल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसमधील जखमींना बाहेर काढताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:04 pm

Web Title: 2 dead 21 injured after a bus fell in a gorge near pawki devi in tehri garhwal
Next Stories
1 रक्षाबंधनसाठी माहेरी जाऊ दिले नाही, महिलेने केली आत्महत्या
2 हिंदू तरुणीचा ‘यू टर्न’, लग्नासाठी धर्मपरिवर्तन केलेल्या मुस्लिम तरुणाची साथ सोडली
3 Kerala Floods : पूरग्रस्तांसाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी गाणं गाऊन मागितली मदत
Just Now!
X