छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात, जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी ) दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.

दोन्ही जखमी जवानांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्यांना विमानाद्वारे रायपूर येथे अधिक उपचारांसाठी हलवण्यात येत आहे. अशी माहिती सुकमा येथील एएसपी शालभ सिन्हा यांनी दिली आहे.