News Flash

काश्मीरमधील हिमस्खलनात दहा जवानांचा मृत्यू

काश्मीरमध्ये हिमस्खलनाच्या दोन घटना

avalanche, kashmir
संग्रहित छायाचित्र

जम्मू काश्मीरमधील लष्करी तळाजवळ झालेल्या हिमस्खलनातील मृतांचा आकडा १० वर पोहोचला आहे. जम्मू काश्मीरमधील गुरेझमध्ये बुधवारी दोनवेळा हिमस्खलन झाले. यानंतर लष्कराकडून लगेचच मदतकार्याला सुरुवात झाली. खराब हवामान आणि जोरदार हिमवृष्टी होत असूनही लष्कराकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत सात जवानांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. गुरुवारी सकाळी सात जवानांचे मृतदेह सापडल्याने हिमस्खलनात मृत पावलेल्या जवानांची संख्या दहा झाली आहे.

जम्मू काश्मीरमधील गुरेझमध्ये बुधवारी दोनवेळा हिमस्खलन झाले. हिमस्खलनाची दुसरी घटना घडली, त्यावेळी या भागातून पहारा देणारे जवान लष्करी तळाकडे निघाले होते. हिमस्खलन झाल्याने काही जवान बर्फाखाली अडकले आहेत. त्यांच्या शोधासाठी मदतकार्य लष्कराने मदतकार्य सुरू ठेवले आहे. बुधवारी गांदेरबाल जिल्ह्यातील सोनमर्गमध्ये हिमस्खलनाची घटना घडली होती. या हिमस्खलनात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता, तर चार जवान जखमी झाले होते.

बुधवारी झालेल्या पहिल्या हिमस्खलनाच्या घटनेत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. हिमवृष्टीमुळे घर बर्फाखाली गाडले गेल्याने ही घटना घडली. गेल्या दोन दिवसांमध्ये काश्मीरच्या विविध भागांमध्ये हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 3:07 pm

Web Title: 2 jawans missing 6 jawans killed after avalanche hits army camp in kashmirs gurez sector
Next Stories
1 देशात यापुढे कोणाची मनमानी चालणार नाही, राहुल गांधींची नाव न घेता मोदींवर टीका
2 प्रजासत्ताक दिनी आसाममध्ये सहा तर मणिपूरमध्ये दोन बॉम्बस्फोट, जीवितहानी नाही
3 जुन्या नोटा बदलण्यासाठी आणखी एक संधी मिळणार ?
Just Now!
X