चर्चमधील सेक्स स्कँडल आणि बलात्कार प्रकरणात एकूण चार पादरींचा समावेश आहे अशी माहिती पुढे आली. चार पैकी दोघांनी कोर्टापुढे शरणागती पत्करली आहे. केरळच्या कोट्टायम मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. स्थानिक पोलिसांनी चर्चमधील सेक्स स्कँडलनंतर चार पादरींविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला. एका पीडितेने आरोप केला होता की चार पादरींनी तिच्यासोबत बलात्कार केला आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेलही केले.

या प्रकरणानंतर केरळमधील चर्चने पादरींना कोर्टापुढे शरणागती पत्करण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन पादरींनी सोमवारी थिरवल्ला जिल्ह्यातील स्थानिक कोर्टापुढे शरणागती पत्करली. जे. के. जॉर्ज आणि सोनी वर्गीज अशी या दोघांची नावे आहेत. आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुली देण्यासाठी महिला आली होती. त्यानंतर चार पादरींनी तिच्यावर बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला होता. या प्रकरणात पोलीस तपास सुरू होता. पीडित महिलेच्या पतीने केलेल्या आरोपानंतर चर्चने या सगळ्यांना बडतर्फ केले होते. चर्चमध्ये या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू आहे.

employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ऑडिओ क्लिप
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये महिलेच्या पतीने तिच्यासोबत झालेल्या अन्यायाची कहाणी कथन केली आहे. या चार पादरींपैकी एकाने लग्नाच्या आधी माझ्या पत्नीचे लैंगिक शोषण केले असाही आरोप पीडितेच्या पतीने केला आहे.