News Flash

सीमेपलीकडून गोळीबार, २ जवान शहीद

पाकिस्तानकडून आज पुन्हा जम्मू-काश्मीरमधील तंगहार सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.

| January 4, 2015 12:04 pm

पाकिस्तानकडून आज पुन्हा जम्मू-काश्मीरमधील तंगहार सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. यात दोन जवान शहीद तर दोन पोलीस देखील जखमी झाले आहेत. सीमेवरील गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये एका महिलेचा देखिल मृत्यू झाला आहे.
काल रात्री पाकिस्तानने काश्मीरमधील कठुआ आणि सांबा या दोन जिह्यांमध्ये गोळीबार केला. त्यांनी त्या परिसरातील गावांसह १३ चौक्यांना लक्ष्य केले होते. पाककडून झालेल्या या गोळीबारात ८ स्थानिक जखमी झाले आहेत. यामुळे भयभीत झालेल्या सीमेवरील काही भागांतील शेकडो नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. कथुआ जिल्ह्यात सुमारे १४०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यांत सीमेवरील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2015 12:04 pm

Web Title: 2 killed and 8 injured in heavy shelling
टॅग : Attack,Line Of Control
Next Stories
1 ‘त्या’ बोटी आमच्या नाहीत!
2 लख्वीच्या जामिनाला आव्हान
3 सरकारबाबत सर्व पर्यायांचा भाजपचा विचार -शहा
Just Now!
X