31 May 2020

News Flash

चकमकीत पाच जवान शहीद

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकींच्या दोन वेगवेगळ्या घटनांत गुरुवारी लष्कराचे पाच जवान शहीद झाले. बारामुल्ला जिल्ह्य़ातील तांगमार्ग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले.

| April 3, 2015 01:47 am

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकींच्या दोन वेगवेगळ्या घटनांत गुरुवारी लष्कराचे पाच जवान शहीद झाले. बारामुल्ला जिल्ह्य़ातील तांगमार्ग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. तर अरुणाचल प्रदेशात नागा बंडखोरांनी लष्कराच्या वाहनांवर केलेल्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले.
लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष मोहीम पथक यांची संयुक्त शोधमोहीम कुंझेर खेडय़ात सुरू असताना सकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनीही गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन जवान शहीद झाले.
अरुणाचलातील तोपी भागात नागा बंडखोरांनी लष्कराच्या वाहनांना लक्ष्य केले. त्यांच्या अंदाधुंद गोळीबारात तीन जवान शहीद झाले तर अन्य तिघे जखमी झाले. लष्करानेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी जंगल भागात पसार झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2015 1:47 am

Web Title: 2 policemen killed in encounter with militants in baramulla district
Next Stories
1 येमेनमधील भारतीय नागरिक मायदेशी
2 चीनकडून पाकिस्तान पाणबुडय़ा घेणार
3 अशोक खेमका यांची ४६व्यांदा बदली, ट्विटरवरून व्यक्त केली नाराजी
Just Now!
X