लष्कर आणि मेघालय पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आसाम-मेघालय सीमेरेषेवर २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
रविवारी पहाटे सुमारे ४ वाजून ४५ मिनिटांनी लष्कर आणि मेघालय पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या परिसरात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी कारवाई केली. दहशतवाद्यांकडून दोन पिस्तुल, काडतुसे अन्य काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यातील एकाचे नाव जिम्मी उर्फ लकनू असे असून, तो मेघालय पोलिसांच्या रडारवर होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 28, 2015 11:51 am