News Flash

बीरभूम जिल्ह्य़ातील स्फोटात तृणमूलचे दोन समर्थक ठार

जबीर हुसने हा तृणमूल काँग्रेसचा ग्रामपंचायत सदस्य असून तो व इतर कुटुंबीय स्फोटातून बचावले आहेत.

| January 23, 2016 12:03 am

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्य़ात आमोदपूर येथे एका घरात बॉम्बचा स्फोट होऊन तृणमूल काँग्रेसचे समर्थक असलेल्या दोन भावांचा मृत्यू झाला. शेख हफीझउल (वय २४) व त्याचा मोठा भाऊ शेख तारिक हुसने हे पहाटेच्यावेळी घरात स्फोट होऊन मरण पावले, असे पोलिस अधीक्षक मुकेश कुमार यांनी सांगितले. मृतांचा भाऊ जबीर हुसने हा तृणमूल काँग्रेसचा ग्रामपंचायत सदस्य असून तो व इतर कुटुंबीय स्फोटातून बचावले आहेत. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की घराचा एक भागच उडाला. पोलिस या घटनेची चौकशी करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 12:03 am

Web Title: 2 trinamool supporters killed in crude bomb blast
Next Stories
1 नेमाडेंची ‘हिंदू’ हा अंतिम निष्कर्ष नाही!
2 भारतमातेने पुत्र गमावल्याचे दुःख समजू शकतो, नरेंद्र मोदींनी मौन सोडले
3 धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सलमान -शाहरूखवरील कारवाईचा अहवाल सादर करा- न्यायालय
Just Now!
X