News Flash

२० वर्षांपूर्वी कोणी लिहिला भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अंक?

भारताने १७१ धावांनी ही कसोटी जिंकली होती

छायाचित्र सौजन्य: ट्विटर/बीसीसीआयने

२० वर्षांपूर्वी म्हणजे २००१ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलकत्ता येथील ईडन गार्डनवर झालेल्या कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वोत्तम भागिदाराची नोंद झाली. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या भारताच्या दोन सर्वोत्कृष्ट फलंदाजांनी याची नोंद केली.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४४ धावांची मजल मारली. भारताच्या हरभजनसिंगने या डावात हॅट्रिक घेतली होती . प्रत्युत्तरादाखल सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारताचा डाव १७१ धावांत संपुष्टात आला आणि त्यामुळे फॉलो ऑनची नामुष्की भारताला पत्करावी लागली.

यावेळी भारताने चांगली सुरुवात केली आणि चार गडी गमावून २३२ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्मण आणि द्रविड यांच्यात भागीदारीला सुरूवात झाली ज्यामुळे मॅचचं वारंच पलटलं. ग्लेन मॅकग्राने बाद केले त्याआधी लक्ष्मणने २८१ धावा फटकावल्या होत्या. द्रविड १८० धावा काढून बाद झाला. भारताने ६५७ वर ७ आपला डाव घोषित केला आणि पाहुण्या संघाला ३८४ धावांचे आव्हान दिले.

कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव २१२ धावांमध्ये आटोपला. भारताने १७१ धावांनी ही कसोटी जिंकली

या भागिदारीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त बीसीसीआयने आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, #२००१ मध्ये, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडने कोलकाताच्या ईडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार भागिदारीचे प्रदर्शन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 2:31 pm

Web Title: 20 years ago v v s laxman and rahul dravid creates history sbi 84
Next Stories
1 काय आहे धोनीच्या नवीन अवतारामागील गूढ? तुम्हाला ठाऊक आहे का?
2 फलंदाजीत सुधारणेचे भारतापुढे आव्हान
3 मुक्तछंदातला पंत
Just Now!
X