News Flash

‘जेएनयूमध्ये रोज ३ हजार कंडोम आणि २ हजार दारुच्या बाटल्या मिळतात’

'जेएनयू' हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून, येथे रोज ३ हजार वापरलेले कंडोम मिळतात

A Heirless Black Bag found , Weapons Found In Jnu, Delhi, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news, BJP
JNU : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जेएनयू विद्यापीठ कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहे.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर देशविरोधी घोषणाबाजीवरून सुरू असलेला देशद्रोहाच्या आरोपाचा वाद आता दिवसेंदिवस आणखी चिघळत चालला आहे. ‘जेएनयू’ हे देशद्रोहाचा अड्डा बनला असल्याची टीका करणाऱया भाजपने पुन्हा एकदा विद्यापीठावर निशाणा साधला. ‘जेएनयू’ हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून, येथे रोज ३ हजार वापरलेले कंडोम मिळत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या आमदाराने केला.

लोकशाही, देशद्रोह अन् सहिष्णुता!

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगडचे भाजप आमदार ज्ञानदेव आहूजा यांनी हे वादग्रस्त विधान केले. जेएनयूच्या परिसरात रोज ३ हजार वापरलेले कंडोम, २ हजार दारुच्या रिकाम्या बाटल्या, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी ५०० इंजेक्शन, ५० हजार हाडांचे तुकडे आणि १० हजार सिगारेटचे तुकडे मिळत असल्याचा आरोप आहूजा यांनी केला आहे. याशिवाय, जेएनयूचे विद्यार्थी हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली ‘नग्न नृत्य’ करीत असतात असाही आरोप त्यांनी केला आहे.

‘राहुल गांधीसुद्धा देशद्रोही, त्यांना गोळ्या घाला’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2016 2:01 pm

Web Title: 2000 liquor bottles 3000 condoms found daily at jnu says bjp mla
टॅग : Bjp,JNU Issue,Rahul Gandhi
Next Stories
1 सरकारच्या कमतरतांवरही संसदेत चर्चा व्हावी – नरेंद्र मोदी
2 …हा व्हिडिओ पाहा आणि पोट धरुन हसा
3 बिगरराजकीय समिती नेमा!
Just Now!
X