24 February 2021

News Flash

२००२ गुजरात दंगल : झाकिया जाफरींची याचिका तहकूब, पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला

आता या प्रकरणी २६ नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे

नरेंद्र मोदींना गुजरात दंगल प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी झाकिया जाफरी यांची याचिका सुप्रीम कोर्टाने तहकूब केली आहे. २००२ मध्ये जेव्हा गुजरात दंगलीचा भडका उडाला तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातमध्ये गोध्रा कांडानंतर झालेल्या दंगलीवरून नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्यात आली. या याचिकेला झाकिया जाफरींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र आज ही सुनावणी तहकूब करण्यात आली.

न्या. ए. एम. खानविलकर आणि दीपक गुप्ता यांनी या याचिकेच्या सुनावणीसाठी १९ नोव्हेंबर ही तारीख नक्की केली होती. मात्र ही सुनावणी आज तहकूब करण्यात आली. झाकिया जाफरी या काँग्रेस नेते इशान जाफरी यांच्या पत्नी आहेत. अहसान जाफरी यांची २००२ मध्ये गुजरात दंगली दरम्यान हत्या करण्यात आली. गुजरात हायकोर्टाने ५ ऑक्टोबर २०१७ रोजी नरेंद्र मोदी आणि इतरांना क्लीन चिट दिली होती. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने आज ही याचिका तहकूब केली आहे. आता या प्रकरणी २६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

याचिकेत २००२ मध्ये ग्रोधा कांडानंतर झालेल्या दंगलीप्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांची विशेष तपास पथकाने दिलेली क्लीन चिट सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. माजी दिवंगत खासदार अहसान जाफरी यांच्या पत्नी झकिया आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची स्वयंसेवी संस्था सिटीजन फॉर जस्टिस अँड पीसने दंगलीमागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप करत नरेंद्र मोदींच्या क्लीन चिट याचिकेवर पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 4:04 pm

Web Title: 2002 riots sc adjourns hearing on zakia jafris plea next hearing on nov 26
Next Stories
1 उर्जित पटेलांमध्ये स्वाभिमान असेल तर ते मोदींना त्यांची जागा दाखवतील : राहुल गांधी
2 ‘…तेव्हा पुजारी राहुल गांधींना आठवण करु द्यायचे; हे मंदिर आहे, मशीद नाही’
3 इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राहुल गांधी आणि इतर नेत्यांचे अभिवादन
Just Now!
X