20 February 2020

News Flash

2019 Nobel Prize: लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर

जॉन बी. गुडइनफ, एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि अकिरा योशिनो अशी या तीन नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या रसायन शास्त्रज्ञांची नावे आहेत.

स्विडन : जॉन बी. गुडइनफ, एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि अकिरा योशिनो या शास्त्रज्ञांना रसायन शास्त्रातील २०१९चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

विविध क्षेत्रातील संशोधनासाठी सध्या नोबेल पुरस्कारांच्या घोषणा केल्या जात आहेत. रॉयल स्विडिश अकॅडमीकडून आज रसायन शास्त्रातील नोबेलची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार अमेरिका, ब्रिटन आणि जपानमधील तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात येणार आहे. लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनासाठी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

जॉन बी. गुडइनफ, एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि अकिरा योशिनो अशी या तीन नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या रसायन शास्त्रज्ञांची नावे आहेत. लिथिअम-आयन बॅटरीमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरांच्या विश्वात क्रांती झाली आहे. या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा छोट्या स्वरुपात साठवून ठेवता येते. या बॅटरीच्या संशोधनामुळे कार, लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे पोर्टेबल झाली आहेत.

नोबेल समितीने या पुरस्काराबाबत म्हटले की, १९७० मधील तेल संकट हे लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनाचे मूळ आहे. तेव्हा व्हायटिंघम यांनी जीवाश्म इंधनमुक्त ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र विकसित करण्याचे ध्येय ठेवले होते. या बॅटरीने आपल्या जीवनात क्रांती आणली आहे.

९ लाख १८ हजार अमेरिकन डॉलर, एक गोल्ड मेडल असे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे स्वरुप आहे. १० डिसेंबर रोजी नॉर्वेतील स्टॉकहोम आणि ओस्लो येथे हे नोबेल पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

First Published on October 9, 2019 5:31 pm

Web Title: 2019 nobel prize in chemistry awarded to 3 scientists for development of lithium ion batteries aau 85
Next Stories
1 दिल्ली मेट्रोसाठी तोडली ४३ हजार ७२७ झाडं पण वाचवली १२ हजार ५८०
2 जम्मू-काश्मीर : स्थानिक नेत्यांच्या सुटकेसाठी काँग्रेसचा ‘बीडीसी’ निवडणुकीवर बहिष्कार
3 अशा तमाशाची गरज नाही; खर्गेंची संरक्षणमंत्र्यांच्या राफेल पूजनावर टीका
Just Now!
X