अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबम तुकी यांच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या २१ आमदारांनी रविवारी बोलाविण्यात आलेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील सत्तारूढ पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे.
अरुणाचल प्रदेश काँग्रेस समिती, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस व्ही. नारायणस्वामी आणि सचिव डॉ. जयकुमार यांनी रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित केली आहे.