दिल्ली विद्यापीठातील एका २१ वर्षीय तरुणीवर तिच्या मित्राच्या मित्राने बलात्कार केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ही पीडीत तरुणी तिचा मित्र योगेश बरोबर कारमधून फिरायला गेली असता योगेशने त्याचा मित्र आसिफलाही सोबत घेतले होते. पीडीत तरूणी म्हणाली, “आसिफने त्याला एका अज्ञात जागी सोडण्यास सांगितले. आम्ही जेव्हा त्याला सोडले तेव्हा तो गाडीची किल्ली घेऊन निघून गेला. त्याला शोधण्याकरिता योगेश बाहेर पडला असता, आसिफ दुसऱ्या मार्गाने आला व गाडी बंद करुन घेतली आणि माझ्यावर बलात्कार केला.”
पीडीत तरुणीने आपल्या बहिणीशी संपर्क साधून, पोलिसांना घटनास्थळी बोलविले. “वैद्यकीय चाचणीतून तरूणीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे आणि आम्ही आसिफचा शोध घेत आहोत” असे पोलिसांनी सांगितले.