मध्यप्रदेशचं कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे, कारण आत्तापर्यंत २२ आमदारांनी कमलनाथ यांची साथ सोडली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि पदांचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला आहे. २२ आमदारांनी साथ सोडल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. गेल्या वर्षभराहून जास्त काळ ज्योतिरादित्य शिंदे हे अस्वस्थ होते. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याचं आणि सगळ्या पदांचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं.

मध्यप्रदेशात धुळवडीच्या दिवशीच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशात आता कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याने भाजपा सत्तास्थापनेची संधी सोडणार नाही. भाजपाकडे १०७ आमदारांचं संख्याबळ आहे. ज्योतिरादित्य शिंदे काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.