त्रिपुरामध्ये शुक्रवारपासून सुरू असलेल्या वादळी वारे व पावसामुळे अनेकजण बेघर झाले आहेत. सध्या किमान ३५० पेक्षा जास्त नागरिकांनी राज्यातील आठ मदत शिबरांमध्ये आश्रय घेतला असल्याची माहिता आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. उत्तरीय त्रिपुरा, उनाकोटी व धलाई जिल्ह्यांना जास्त फटका बसला आहे. राज्यात ‘एनडीआरएफ’ च्या २२ पथकांद्वारे मदत व बचाव कार्य सुरू आहे. जर पाऊस थांबला तर पुढील २४ तासात आम्ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणू असे राज्य प्रशासनाद्वारे सांगण्यात आले आहे.

तर आतापर्यंत मदत शिबारांमध्ये आश्रय घेतलेल्या ७३९ नागरिकांपैकी ३५८ जण उनाकोटी तर ३८१ जण हे उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील आहेत. मुसळधार पावसामवळे किमान १ हजार ०३९ घरांचे नुकसान झाले आहे. ४० होड्यांद्नारे नुकसानग्रस्त भागात अडकलेल्या नागिरकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.

एनडीआरएफ बरोबरच त्रिपुरा स्टेट राइफल्सचे पथक देखील बचाव कार्य करत आहे. शनिवारी दुपारनंतर उनकोटी जिल्ह्यातील मनु नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. तर हवामान खात्याने रविवारी दिवसभर राज्यभरात पाऊस व वादळी वारे सुरूच राहिल, अशी शक्यता वर्तवली आहे.