News Flash

“मृत्यू की हत्या?” कर्नाटक दुर्घटनेवर राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २४ रुग्णांचा मृत्यू

संग्रहित

देशात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय सुविधांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांनी आपला जीव गमावल्याच्या घटनाही घडत आहे. अशातच कर्नाटकातली अजून एक घटना समोर आली आहे. काल म्हणजेच रविवारी रात्री कर्नाटकातल्या चामराजनगर जिल्ह्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा- दिरंगाईने घेतले २४ बळी; ऑक्सिजनअभावी रुग्णांचा तडफडून मृत्यू

या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, मेले की मारलं? त्यांच्या कुटूंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. व्यवस्थेला जाग येण्याआधी अजून असा किती त्रास सहन करावा लागणार आहे?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनीही या प्रकरणाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तसेच लवकरच या प्रकरणाची स्वतः दखल घेत चौकशी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 1:06 pm

Web Title: 24 killed in karnatak due to oxygen shortage rahul gandhi said vsk 98
Next Stories
1 काळाने साधला डाव! ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू
2 दिल्लीत आजपासून तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाला सुरुवात
3 माध्यमांना थांबवू शकत नाही; निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा झटका
Just Now!
X