महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेच्या काही दिवस आधी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील बोगस विद्यापीठांची यादीच जाहीर केली आहे. देशातील २४ बोगस विद्यापीठामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीतील विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचाही यात समावेश आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आपल्या अधिकृत संकेतस्थाळावर (ugc.ac.in ) देशातील बोगस २४ विद्यापीठाची यादी जाहिर केली आहे. यूजीसीचे सचिव रजनीश जैन म्हणाले की, संसदीय अधिनियन आणि युजीसी कायद्यानुसार 24 संस्थांना विद्यापीठ शब्द वापरण्याचा अधिकार नाही. या विद्यापिठांनी बोगस विद्यापीठं म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. या विद्यापीठानं कायद्याचं उल्लघंन केल्यामुळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या २४ विद्यापीठांना कोणतीही पदवी प्रदान करण्याचा आधिकार नाही.

ugc marathi news, ugc academic year marathi news
शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार? युजीसीने दिल्या सूचना…
corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या यादीमध्ये उत्तर प्रदेशमधील ८ आणि दिल्लीतील सात विद्यापिठांचा समावेश आहे. तसेच ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील दोन-दोन विद्यापीठांचा समावेश आहे. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि पुडुचेरी येथील प्रत्येकी एका विद्यापीठाचा समावेश आहे.

UGC ने जाहीर केलेल्या खोट्या विद्यापीठांची यादी

  1. कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज, दिल्ली
  2. युनाटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, दिल्ली
  3. व्होकेशनल युनिव्हर्सिटी, दिल्ली
  4. एडीआर सेंट्रिक जूरीडिकल युनिव्हर्सिटी, एडीआर हाउस, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली
  5. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एंड इंजीनियरिंग, नवी दिल्ली
  6. विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एंप्लॉयमेंट, संजय एंक्लेव, नवी दिल्ली
  7. आध्यात्मिक विद्यापीठ (स्पिरिचुअल युनिव्हर्सिटी), रोहिणी, दिल्ली
  8. बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी, बेळगाव, कर्नाटक
  9. सेंट जॉन युनिव्हर्सिटी, कृष्णाटम्, केरळ
  10. राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर, महाराष्ट्र 
  11. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन, चौरंगी रोड, कोलकाता, पश्चिम बंगाल
  12. इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेसिन एंड रिसर्च, कोलकाता, पश्चिम बंगाल
  13. वारणसेय संस्कृत विवि, वाराणसी, उत्तर प्रदेश / जगतपुरी, दिल्ली
  14. महिला ग्राम विद्यापीठ / विवि (महिला विद्यापीठ), प्रयागराज, उत्तर प्रदेश
  15. गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयागराज, उत्तर प्रदेश
  16. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होम्योपैथी, कानपुर, उत्तर प्रदेश
  17. नेताजी सुभाष चंद्र बोस युनिव्हर्सिटी (मुक्त विद्यापीठ), अलीगढ़, उत्तर प्रदेश
  18. उत्तर प्रदेश विद्यापीठ, मथुरा, उत्तर प्रदेश
  19. महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यापीठ, प्रतापगढ़, उत्तर प्रदेश
  20. इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद्, नोएडा, उत्तर प्रदेश
  21. नव भारत शिक्षा परिषद्, राउरकेला, ओडिशा
  22. नॉर्थ ओडिशा युनिव्हर्सिटी ऑफ एग्रीकल्चर एंड टेक्नोलॉजी, मयूरगंज, ओडिशा
  23. श्री बोधि एकेडमी ऑफ हायर एजुकेशन, पुडुचेरी
  24. क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर, आंध्र प्रदेश