News Flash

सीमेपलीकडून ३०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत; लष्कराची माहिती

दोन दहशतवाद्यांना लष्कराकडून कंठस्नान

एलओसीच्या पलिकडे लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आज (शनिवार) लष्कराकडून देण्यात आली. जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना आज लष्कराच्या जवानांकडून कंठस्नान घालण्यात आलं. त्यानंतर लष्कराकडून याबाबत माहिती देण्यात आली.

मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी या घटनेनंतर पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. सीमेपलीकडील लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी दिली. दरम्यान, सकाळी लष्करानं केलेल्या कारवाईबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. लष्करानं ठार केलेल्या जवनांकडून मॅगझिन. एक पिस्तुल, हातगोळे आणि दोन एके असॉल्ट रायफल्स जप्त केले. तसंच भारतीय आणि पाकिस्तानी चलनातील दीड लाख रूपयेदेखील जप्त करण्यात आल्याचे ते म्हणाले. सध्या सर्वच क्षेत्रात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

उत्तर काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये आज सकाळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोघांनाही लष्कराच्या जवानांनी कंठस्नान घातलं. यापूर्वी त्या भागात लष्कराच्या जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्यानंतर जवान अॅलर्ट झाले आणि त्वरित कारवाई करत त्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 4:01 pm

Web Title: 250 300 terrorists presently occupying the launchpads opposite trying to enter in india indian army jud 87
Next Stories
1 Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदींची गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यासोबत बैठक
2 करोना विषाणूची माहिती चीनने लपवली, आणखी एका तज्ज्ञाचा दावा
3 … तर हाती बंदूकही घेईन; विकास दुबेच्या पत्नीची तीव्र प्रतिक्रिया
Just Now!
X