दमास्कसच्या पूर्वेकडील सिमेंट कारखान्यावर आयसिसने केलेल्या हल्ल्यानंतर सीरियाच्या जवळपास २५० नागरिकांचे अपहरण केल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कारखान्यावर हल्ला केल्यानंतर सोमवारपासून आमचा कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे एका नागरिकाने सांगितले. सदर २५० जण कोठे आहेत त्याचा ठावठिकाणा माहिती नाही.
कारखान्यात काम करणाऱ्या प्रशासकाने सांगितले की, सोमवारपासून २५० कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. या कारखान्यातून आयसिसने अनेक कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांना अज्ञात स्थळी नेले असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
आयसिसच्या दहशतवाद्यांनी दमेइर हवाई तळ आणि ऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळविण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र तो फोल ठरला असे सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले.

Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
virar Sand Mafia, Sand Mafia active
वसई विरार : खाडी किनारी वाळू माफिया सक्रिय, भरारी पथकाची कारवाई, ४ बोटी केल्या नष्ट
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते