02 March 2021

News Flash

यस बँकेकडून २५०० कर्मचाऱ्यांची कपात

१० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

(संग्रहित छायाचित्र)

सरकारी क्षेत्रापासून खासगी आणि बँकिंग क्षेत्र अशा सर्वच ठिकाणी कर्मचारी कपात सुरु असताना यस बँकेनेही आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यस बँकेतील २५०० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. ही संख्या खूप मोठी असून बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. कर्मचाऱ्यांची खराब कामगिरी, डिजिटायझेशन आणि लोकांची तितकी आवश्यकता नसल्याने ही कपात करण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. सध्या यस बँकेत २१ हजार कर्मचारी काम करतात. त्यातील २५०० कर्माचाऱ्यांची आता कपात करण्यात येणार आहे.

मोहरमच्या दिवशीही दूर्गादेवी मूर्तीचे विसर्जन होणार, ममतांना हायकोर्टाचा झटका

याआधी एचडीएफसी बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कपात केली होती. त्यानंतरची बँक कर्मचाऱ्यांची ही दुसरी मोठी कपात आहे. एचडीएफसी बँकेने मार्च २०१७ पर्यंत तीन टप्प्यांमध्ये आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले होते. याबाबत यस बँकेने म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांची कामगिरी पाहून बँक अशाप्रकारचे काही महत्त्वाचे निर्णय घेत असते. त्यानुसार आताची कपात करण्यात आली आहे. आम्ही आता जो निर्णय घेतला आहे, तो इतर खासगी बँकांप्रमाणेच असून त्याकडे कोणत्याही वेगळ्यादृष्टीने पाहिले जाऊ नये. भारतीय बँकिंग उद्योगाचा सध्याचा अॅट्रेशन रेट १६ ते २२ टक्के इतका आहे.

वैद्यकीय प्रवेश घोटाळा, ओडिशा हायकोर्टातील निवृत्त न्यायाधीशांना अटक

सध्या आम्ही सर्व व्यवहार डिजिटल करण्याच्या प्रयत्नात आहोत. यामध्ये ऑटोमेशन आणि डिजिटायझेशन वाढविले जात आहे. उत्पादकता वाढविणे हा याचा मूळ उद्देश असून ग्राहक सेवा सुधारण्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आता देशभरात बँकेच्या १०२० शाखा असून कपात करताना विशिष्ट शाखेतून कपात होईल असे स्पष्ट करण्यात आलेले नाही. एटीएम, ऑनलाइन बँकिंग तसेच पासबूक भरण्यासाठी असणारे मशीन अशा तांत्रिक गोष्टींमध्ये वाढ होत असल्याने बँकेला अशाप्रकारचा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 6:09 pm

Web Title: 2500 employees have been removed from yes bank
Next Stories
1 रोहिंग्या मुस्लिम शरणार्थी नव्हे तर बेकायदा स्थलांतरितच: राजनाथ सिंह
2 मोहरमच्या दिवशीही दूर्गादेवी मूर्तीचे विसर्जन होणार, ममतांना हायकोर्टाचा झटका
3 लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करा; सोनिया गांधींचे मोदींना पत्र
Just Now!
X