26 January 2021

News Flash

२६ वर्षीय बंगाली अभिनेत्रीवर तिच्याच फ्लॅटमध्ये बलात्कार करुन शूट केला व्हिडिओ

धमकीच्या भितीने गुन्हा घडल्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्रीने दाखल केली तक्रार

प्रतिकात्मक फोटो

पश्चिम बंगालामधील कोलकाता शहरातील बिजॉयगड परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका २६ वर्षीय अभिनेत्रीवर ओळखीच्या इसमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने या अभिनेत्रीच्या घरातच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. या प्रकरणात अभिनेत्रीने ८ जुलै रोजी जादवपूर पोलीस स्थानकामध्ये बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. यानंतर या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जुलै रोजी एक ओळखीची व्यक्ती या अभिनेत्रीच्या घरी आर्थिक मदत मागण्यासाठी आला होता. याच वेळेस घरात ती एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला. मी घरात एकटीच राहते असं या अभिनेत्री आपल्या तक्रारीमध्येही नमूद केलं आहे. या तरुणीवर बलात्कार करतानाचा व्हिडिओही या व्यक्तीने रेकॉर्ड केला असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच यासंदर्भात कुठे वाच्यता केल्यास हा व्हिडिओ आपण व्हायरल करु अशी धमकी या व्यक्तीने दिल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. या धमकीला घाबरुन प्रसंग घडल्यानंतर काही दिवस ही अभिनेत्री पोलिसांकडे आली नव्हती. अखेर ८ जून रोजी तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठी ही अभिनेत्री आपल्या मूळ गावापासून लांब कोलकत्यामध्ये एकटीच राहत होती. ज्या व्यक्तीने बलात्कार केला ती व्यक्ती या अभिनेत्रीच्या चांगल्याचा ओळखीची असल्याचे सांगण्यात येते. मात्र काही काळापूर्वी दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फेसबुकवरुन या मुलाने अभिनेत्रीला संपर्क केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आधी तिने त्याला भेटण्यास नकार दिला. मात्र नंतर या तरुणाने लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान झाल्याने मदत हवी असल्याचं या अभिनेत्रीला सांगितलं. या अभिनेत्रीने या मुलाला पैसे घेण्यासाठी घरी बोलवलं. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. या प्रकरणामध्ये तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 6:45 pm

Web Title: 26 year old bengali actress model allegedly raped at her kolkata residence scsg 91
Next Stories
1 चिंताजनक: बंदिस्त व गर्दीच्या जागी हवेतून पसरू शकतो करोना; WHO चं शिक्कामोर्तब
2 ICSE, ISC बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर
3 “…तर योगी आदित्यनाथ यांचं दुबे कनेक्शन होतं हे मानायचं का?”
Just Now!
X