News Flash

बिहारमध्ये बस पलटी होऊन लागली भीषण आग, २७ जणांचा मृत्यू

बिहारमधील मोतिहारी येथे बस पलटी होऊन लागलेल्या आगीत २७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस मुझफ्फरनगर येथून

बिहारमधील मोतिहारी येथे बस पलटी होऊन लागलेल्या आगीत २७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस मुझफ्फरनगर येथून दिल्लीला जात होती. बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरुन खाली उतरली आणि थेट खड्डयात जाऊन पलटी झाली. यानंतर बसला आग लागली ज्यामुळे प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही आणि होरपळून मृत्यू झाला.

हा अपघात राष्ट्रीय महामार्ग २८ वर झाला आहे. बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे. अपघातानंतर ग्रामस्थांसहित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 6:02 pm

Web Title: 27 people died after bus overturned in bihar
Next Stories
1 आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार
2 चीनची आक्रमकता! दक्षिण चीन सागरातील तीन तळांवर तैनात केली क्रूझ मिसाईल सिस्टीम
3 रिक्षाचालकाने दिला दगा, १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
Just Now!
X