News Flash

…म्हणून २७ वर्षीय तरुणीने प्रियकरावर केला अ‍ॅसिड हल्ला

ते दोघे पुण्यामध्ये एकत्र राहत होते

प्रातिनिधिक फोटो

त्रिपुरामधील पोलिसांनी एका २७ वर्षीय तरुणीला प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. मंगळवारी पोलिसांनी राजधानी आगरतलापासून ५० किमीवर असणाऱ्या खोवाई तालुक्यातील बेलचेरा गावातील या तरुणीला ताब्यात घेतलं. आठवडाभरापूर्वी या तरुणीने आपल्याच प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला केला. तरुणाने लग्नाला नकार देत दोघांमधील नात संपवण्याची मागणी केली असता संपापलेल्या तरुणीने रागाच्या भरात त्याच्यावर अ‍ॅसिड फेकल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

स्थानिक न्यायालयाने या प्रकरणामध्ये तरुणीला १४ दिवसांची न्यायालीय कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बिना संथल आणि तिचा ३० वर्षीय प्रियकर सोमन संथल हे दोघे मागील नऊ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. २०१० पासून हे दोघे पुण्यामध्ये एकत्र राहत होते. त्रिपुरामध्ये दोघांची कुटुंब शेजरी राहतात. पुण्यात राहत असतानाच बिना सोमनला अभ्यासात आणि आर्थिक हातभार लावण्यासाठी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि इतर लहानसहान काम करायची. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सोमन एका खासगी कंपनीमध्ये काम करु लागला. तो २०१९ ला त्रिपुरामध्ये परत आला. त्याने हळूहळू बिनाशी बोलणं कमी केलं. बिनाने अनेकता सोमनशी बोलण्याचा त्याला भेटण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस तिच्या हाती निराशाच आली.

१९ ऑक्टोबर रोजी बिनाला खोवाईमध्ये सोमन दिसला. तिने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या बिनाने त्याच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सोमनच्या चेहऱ्याला आणि तोंडाजवळ गंभीर जखमा झाल्या असून त्याला स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती खालावल्याने त्याना अगरतळामधील गोविंद बल्लभ पंत रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

“सोमनच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवल्यानंतर आम्ही या प्रकरणात मंगळवारी बिनाला अटक केली आहे,” असं या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सय्यद उद्दीन यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 8:52 am

Web Title: 27 year old woman arrested for throwing acid on lover police scsg 91
Next Stories
1 आम्ही हिंदुस्थानला घरात घुसून मारले म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याचा यु-टर्न, म्हणाले…
2 “राज्यात अल-कायदा पाय पसरतोय, प्रत्येक कार्यक्रमात होतोय बॉम्बचा वापर”
3 “बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो”
Just Now!
X